Header

Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

Accident On Pune-Nashik Highway

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि जीमध्ये झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जाणांचा जागीच मृत्यू (Death In Accident) झाला. तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.1 डिसेंबर) पहाटेच्या पाचच्या सुमारास मंचर जवळ झाला आहे. (Pune Accident News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पण्याकडे चाललेल्या क्रूझर वाहनाने आज (शुक्रवार) पाहाटे पाचच्या सुमारास
दाट धुक्यामुळे पुढील अंदाज न आल्यामुळे ट्रकला पाठिमागून जोरदार धडक दिली.
यामध्ये चालक पंकज खंडु जगताप (वय-36), मधुकर तुकाराम अहिरे (वय-52), शांताराम संभाजी अहिरे
(वय- 50 सर्व रा. जायखेडा, ता. सटाणा) या तिघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमींना
मंचर उपजिल्हा रुग्णालयात (Manchar Upazila Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेऊन
इतर वाहनांना रस्ता मोकळा करुन दिला. (Pune Accident News)

धुके अधिक असल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यामुळे वाहन चालकाला गाडीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
क्रुझ्ररचा पुढचा संपूर्ण भाग ट्रकच्या मागच्या बाजूस शिरल्याने पुढे बसलेल्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
त्यात पाच जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

The post Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article