Header

Pune Crime News | क्लिनीकमध्ये तपासणीसाठी गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरवर गुन्हा; स्वारगेट परिसरातील घटना

Pune Crime News | क्लिनीकमध्ये तपासणीसाठी गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरवर गुन्हा; स्वारगेट परिसरातील घटना

Molestation Case Against Neurologist

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मायग्रेनचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली आहे. याप्रकरणी न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) डॉक्टरवर स्वारगेट पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर रोजी मुकूंदनगर येथे सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या तरूणीने गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून डॉ. श्रीपाद पुजारी Dr. Shripad Pujari (रा. बिझनेस कोर्ट, मुकूंदनगर, स्वारगेट) याच्यावर आयपीसी 354अ नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीपाद पुजारी हे न्यूरोलॉजिस्ट असून त्यांचे मुकूंदनगर येथील
बिझनेस कोर्ट (Business Court Mukundnagar) येथे क्लिनिक आहे. फिर्यादी तरूणीला मायग्रेनचा (Migraine) त्रास
होत असल्याने त्या डॉ. पुजारी यांच्या क्लिनिकमध्ये बुधवारी सायंकाळी तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पुजारी याच्या केबिनमध्ये कोणतीही महिला अटेंडन्ट नव्हती. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील बोलून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कीर्ती चाटे (PSI Kirti Chate) करीत आहेत.

The post Pune Crime News | क्लिनीकमध्ये तपासणीसाठी गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरवर गुन्हा; स्वारगेट परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article