Header

Pune Crime News | पाच वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना; 28 वर्षाच्या तरुणावर FIR

Pune Crime News | पाच वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना; 28 वर्षाच्या तरुणावर FIR

Sexual Harassment

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या (Sexual Harassment) घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यातील सांगवी सांडस येथे पाच वर्षाच्या मुलासोबत आणि मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि.25) सायंकाळी चार ते पाच या दरम्यान सांगवी सांडस येथील आरोपीच्या घरात घडली. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पीडित मुलांच्या 29 वर्षीय आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या Swapnil Dhamdhere alias Tatya (वय-28 रा. सांगवी सांडस, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 354, 354अ सह पोक्सो कलम 8,12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पाच वर्षाचा मुलगा व मुलगी घराच्या अंगणात खेळत होते. त्यावेळी आरोपी त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने मुलांना मोबाईलमध्ये अश्लील फोटो दखवले. त्यानंतर फिर्यादी यांच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पिडित मुलांच्या आईला समजल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.26) लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भदे (PSI Bhade) करीत आहेत.

The post Pune Crime News | पाच वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना; 28 वर्षाच्या तरुणावर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article