Header

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

Sassoon Hospital-Drug Mafia Lalit Patil Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Drug Case | ड्रग माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) हा ससून रुग्णालयात असताना ड्रग रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सहाय्य करणारा ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (Mahendra Shevte) याला पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) सोमवारी रात्री उशिरा अटक केली (Sassoon Hospital Drug Case). या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. (Pune Drug Case)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्या अत्यंत जवळचा आणि कैद्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा म्हणून महेंद्र शेवते याला ओळखले जात होते. या प्रकरणात पोलिसांनी पोलीस दलातील १० अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोन पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. असे असले तरीही ससून रुग्णालयातील कोणावरही कारवाई केली नव्हती. (Pune Drug Case)

शेवते हा ससून रुग्णालयातील जुना कर्मचारी असून तो कैदी व त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहून सेटलमेंट
करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महेंद्र शेवतेला अटक झाल्यानंतर ससून रूग्णालयातील अनेक भानगडी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

The post Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article