Pune Crime News | खिशातून पैसे काढल्याच्या रागातून तरुणाचा खून, खराडी मधील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | खिशातून 500 रुपये काढल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन खून (Murder In Pune) केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना 8 नोव्हेंबर रात्री एक ते 9 नोव्हेंबर सकाळी साडेनऊच्या दरम्यान खराडी येथील म्हसोबा मंदिराजवळ घडली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किरण अशोक साठे Kiran Ashok Sathe (वय-24 रा. खराडी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लोकेश रविंद्र पाटील (वय-22 रा. पाटील वस्ती, केसनंद, पुणे) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष मच्छिंद्र घोडके (PSI Goraksh Machhindra Ghodke) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. ससून हॉस्पिटलमधील शवविच्छेदन अहवालात खून असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण साठे याने आरोपी लोकेश पाटील याच्या खिशातून गुपचूप 500 रुपये
काढून घेतले. याच कारणावरुन आरोपी लोकेश याने लाकडी बांबूने किरणच्या डोक्यात, हातावर व नाकावर मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी होऊन किरणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी
धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून किरण साठे
याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर (API Khandekar) करीत आहेत.
- ‘भाऊबीज’ सणानिमित्त पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’
- Pune PMP News | पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ९ हजार ४५१ सेवकांना बोनस
- ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्यावर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल
The post Pune Crime News | खिशातून पैसे काढल्याच्या रागातून तरुणाचा खून, खराडी मधील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक appeared first on बहुजननामा.