Header

Pune Crime News | गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

Pune Crime News | गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

Mundhwa Police

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्टल आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई घोरपडी मुंढवा रोडवर करण्यात आली. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आदित्य महेश चौधरी (वय-21 रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दिनेशन राणे, स्वप्नील रासकर यांना माहिती समजली की, घोरपडी मुंडवा रस्त्यावर आदित्य चौधरी हा फिरत असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करुन पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुस जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता रोकडे (PI Sangeeta Rokade), तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, संतोष काळे, स्वप्नील रासकर, दिनेश भांदुर्गे, राहुल मोरे, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

The post Pune Crime News | गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article