Header

Pune Crime News | पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण, धायरी मधील घटना

Pune Crime News | पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण, धायरी मधील घटना

Kidnapping Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | अपहरण (Kidnapping Case) करुन पळवून नेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरुन चार अनोळखी व्यक्तींनी एका 22 वर्षाच्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन बेदम मारहाण (Beating) करत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.11) सकाळी साडे अकराच्या सुमारास धायरी ब्रिजवर कचरा डेपो जवळ घडली. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत अर्जुन रंगराव राठोड (वय-22 रा. रायकर मळा, पुणे) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीवरील अज्ञात चार आरोपींवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन राठोड याच्या मैत्रिणीला आज्ञात आरोपीने तिच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिचे अपहरण करुन पळवून नेले आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अर्जुन राठोड कॅनॉल रोडवरील कचरा डेपोजवळून पायी चालत जात होता. त्यावेळी दोन दुचाकीवरुन चार अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आले.
त्यांनी पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरून अर्जुनला आडवले.
तसेच ‘मुलगी कोठे आहे सांग नाहितर मारुन टाकीन’ अशी धमकी देऊन लाकडी बांबूने बेदम मारहाण केली.
तसेच ‘दोन दिवसात मुलगी घरी आणून नाही दिली तर तुला मारुन टाकेन’ अशी धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Crime News | फटाके फोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सुरक्षा रक्षकाला अटक; कल्याणीनगर मधील घटना

Ration Card | रेशन कार्डवर दरवर्षी मिळणार एक साडी मोफत, २४ लाख कुटुंबांना लाभ

Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Skin Care – Pimples Problem | आजपासून ‘या’ गोष्टी खाणे करा बंद, तुमच्या चेहऱ्यावर कधीच येणार नाही मुरुम आणि वांग…

Kidney Stone Diet | किडनी स्टोनच्या रूग्णांनी खा ‘ही’ फळे, लवकरच पडेल किडनीतील स्टोन…

The post Pune Crime News | पळून गेलेली मुलगी संपर्कात असल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण, धायरी मधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article