Header

Pune Crime News | पुणे गोळीबार प्रकरण : सराफावर गोळीबार करुन लुटणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी दिल्लीतून केली अटक

Pune Crime News | पुणे गोळीबार प्रकरण : सराफावर गोळीबार करुन लुटणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी दिल्लीतून केली अटक

Pune Firing Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सराफी पेढी बंद करुन दुचाकीवरुन निघालेल्या सराफ व्यावसायिकाचा पाठलाग करुन करुन गोळीबार (Pune Firing Case) करत लुटल्याची घटना घोरपडी परिसरातील बी.टी. कवडे रस्त्यावर 8 नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना वानवडी पोलिसांनी (Pune Police) दिल्लीतून अटक केली आहे. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अहमद असदली त्यागी (वय 34 रा. सिलमपुर, उत्तर पूर्व दिल्ली मुळ रा. हंडीया मोहल्ला, मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश), हनी जीते वाल्मिकी (वय 26 रा. आंबेडकर वस्ती, साऊथ वेस्ट दिल्ली) आणि सागर राज कुमार (वय 26, रा. वाल्मीकी मुहल्ला, नॉर्थ वेस्ट दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सर्फराज शेख (वय-23), लखन अंकोशी (वय-35 दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (वय-30 रा. घोरपडी) यांना यापूर्वीच अटक केली आहे. या घटनेत साराफी व्यावसायिक प्रतीक मदनलाल ओसवाल (वय-30 रा. मुंढवा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे वडील मदनलाल ओसवाल यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 397, 341, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या दिवशी आरोपी सय्यदनगर परिसरातील ओसवाल यांच्या पेढजवळ गेले. ते पेढी बंद करुन दुचाकीवरुन जात असताना सर्फराज, रफीक, लखन आणि त्यांच्या साथीदारांनी ओसवाल यांना बी.टी. कवडे रोडवर आडवले. त्यांनी प्रतिक ओसवाल यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिक यांनी विरोध केला. त्यावेळी आरोपीपैकी एकाने त्याच्याकडील गावठी पिस्टलने प्रतिक यांच्या दोन्ही पायावर व गालावर गोळी झाडून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची बॅग हिसकावुन पळून गेले. बॅगेमध्ये दोन तोळे सोन्याच दागिने व रोख दहा हजार रुपये होते. (Pune Crime News)

गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी दिल्ली येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वानवडी पोलिसांचे एक पथक तातडीने दिल्ली येथे रवाना करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील तीन आरोपींना शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गुन्हे शाखा युनिट-5 ने केलेल्या तपासात गुन्ह्यातील आरोपी सर्फराज हनिफ शेख (वय-23 रा. रामटेकडी) याच्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे,
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पाटणकर, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक संतोष सोनवणे,
पोलीस अंमलदार अजय केसकर, अमजद पठाण, संतोष नाईक, अतुल गायकवाड,
हरिदास कदम, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, निलकंठ राठोड, यतीन भोसले, राहुल माने, विठ्ठल चोरमले,
अमोल गायकवाड व सोनम भगत तसेच गुन्हे शाखा युनिट-5 चे पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या पथकाने केली.

The post Pune Crime News | पुणे गोळीबार प्रकरण : सराफावर गोळीबार करुन लुटणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी दिल्लीतून केली अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article