Header

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! तू इथे का थांबलास? असं म्हणत तरुणाच्या छातीत चाकू भोसकून खून

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! तू इथे का थांबलास? असं म्हणत तरुणाच्या छातीत चाकू भोसकून खून

Murder In Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात गुन्हेगारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. किरकोळ कारणावरुन खूनाच्या घटना घडत आहेत. दरम्यान, पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत (Pune-Mumbai Old Highway) अंधारात थाबलेल्या तरुणाला ‘तू इथे का थांबलास?’ अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण (Beating) केली. एवढंच नाही तर, तरुणाच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेळके असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून ही घटना रविवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. कृष्णा शेळके हा त्याच्या इतर दोन मित्रांसह महामार्गालगत अंधारात थांबला होता. तिघांना बघून चार अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आले. तुम्ही इथे का थांबलात, कशासाठी थांबलात? अशी विचारणा करत त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चौघांपैकी एकाने चाकू काढून कृष्णाच्या छातीत भोसकला. यात गंभीर जखमी होऊन कृष्णाचा मृत्यू झाला. (Pune Crime News)

या घटनेनंतर चार आरोपींनी त्या ठिकाणावरुन पळ काढला. कृष्णा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही.
केवळ अंधारात थांबल्यामुळे त्याला अज्ञात चार जणांनी विचारणा केल्याने त्यावरुन त्यांच्यात वाद झाले,
अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपींचा शोध तळेगाव पोलीस (Talegaon Dabhade Police Station)
करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गाच्या परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

The post Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! तू इथे का थांबलास? असं म्हणत तरुणाच्या छातीत चाकू भोसकून खून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article