Header

Pune Pimpri Crime News | किरकोळ कारणावरुन प्रियकरावर कोयत्याने वार

Pune Pimpri Crime News | किरकोळ कारणावरुन प्रियकरावर कोयत्याने वार

Hinjewadi Police Station

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | प्रियकराला (Boyfriend) हॉटेलमधून जाण्यास सांगितले असताना देखील तो गेला नाही. याचा राग आल्याने प्रेयसीने प्रियकरावर धारदार कोयत्याने (Koyta) सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी तीनच्या सुमारास वाकड येथील अटलांटा सोसायटी जवळ घडली. याप्रकरणी महिलेवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

संजय नारायण जाधव (वय-45 रा. श्रीधरनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेवर आयपीसी 307 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जाधव हा रिक्षा चालवण्याचे काम करतो तर महिला हॉटेल चालवते. फिर्यादीचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध (Love Affair) असून दोघेही वाकड येथे राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्य़ादी हॉटेलमध्ये आले. त्यावेळी महिलेने त्याला हॉटेलमधून राहते घरी जाण्यास सांगितले.
मात्र, संजय जाधव हे गेले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाले.
चिडलेल्या महिलेने धारदार कोयत्याने संजय जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात,
हातावर, छातीवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

The post Pune Pimpri Crime News | किरकोळ कारणावरुन प्रियकरावर कोयत्याने वार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article