Header

Pune Crime News | धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण

Pune Crime News | धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण करुन धमकी (Threat) दिल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाना पेठेतील होप हॉस्पिटलसमोर (Hope Hospital) 23 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत काशेवाडी भवानी पेठ (Bhawani Peth) येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे Prashant Sanjay Kamble (वय-20 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354b ड, 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
याचा राग आरोपीच्या मनात होता. पीडित तरुणी नाना पेठेतील (Nana Peth) हॉप हॉस्पिटल समोरून जात
असताना आरोपीने तिला आडवले. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग (Molestation) केला. तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तु माझी झाली नाही तर कोणाची होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव (PSI Yadav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The post Pune Crime News | धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article