Header

Pune Crime News | चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू; हडपसर परिसरातील घटना

Pune Crime News | चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू; हडपसर परिसरातील घटना

Child Death

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुदद्वाराला (Anus) एअर कॉम्प्रेसरचा (Air Compressor) पाईप लावून त्याच्या अंगात हवा भरली. या अघोरी कृत्यामुळे अल्पवयीन मुलाचा जागेवर मृत्यू (Child Death) झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.4) सकाळी साडेदहा ते अकरा या दरम्यान हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट येथील पुना फ्लोअर अँड फुड्स (Pune Flour and Foods) या कंपनीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मोतीलाल साहू (वय-16) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय-21 रा.हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट, हडपसर) याच्यावर आयपीसी 304 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहू (वय 34, रा. मूळ बडागाव, मध्य प्रदेश) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पुना प्लोअर अँड फुड्स या कंपनी काम करतात.
सोमवारी सकाळी आरोपी, फिर्यादी व त्यांचा मयत भाचा कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत होते.
त्यावेळी चेष्टा मस्करीत आरोपीने कंपनीत साफसफाईसाठी वापरत असलेला हवेचा एअर कॉम्प्रेसरचा पाईप फिर्यादी
यांचा भाचा मोतीलाल याच्या गुदद्वाराला लावला. मोतीलाल याच्या पोटात भरली गेल्याने शरिरात गंभीर दुखापत
होऊन मोतीलाल याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे (PSI Kavale)करीत आहेत.

The post Pune Crime News | चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू; हडपसर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article