Header

Pune Crime News | डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना

Pune Crime News | डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना

Rape In Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊ महिलेवर वारंवार अत्याचार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील लोकमंगल कारखान्यातील (Lokmangal Factory Lohara) सुपरवायझरवर (Supervisor) पुण्यात गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 दरम्यान आणि 9 नोव्हेंबर रोजी घडला आहे. आरोपीने पीडित महिलेवर लोहारा आणि वाघोली परिसरातील निर्जन स्थळी अत्याचार केला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरुन अंकुश मन्नु राठोड Ankush Mannu Rathod (रा. जळकोट रामतिर्थ तांडा, उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे पती लोहारा येथील लोकमंगल कारखान्यात कामाला आहेत.
तर आरोपी महिलेच्या पतीचा सुपरवायझर आहे. त्याने पतीला कामावरुन काढून टाकण्याची व मुलांना मारुन
टाकण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच महिलेला हाताने मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने
शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने लोहारा आणि वाघोली येथे महिलेसोबत शरीर संबंध ठेवले.
आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.

The post Pune Crime News | डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article