Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, 6 जणांवर FIR; वारजे पोलिसांकडून 4 जणांना अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, 6 जणांवर FIR; वारजे पोलिसांकडून 4 जणांना अटक

Chandan Nagar Police

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | एका टोळक्याने तिघांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी सहा जणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन सराईत गुन्हेगारांसह चार जणांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील दिगंबरनगर येथे रविवारी (दि.24) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत सौरभ संतोष पाडळे (वय-22 रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने सोमवारी (दि.25) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टुणटुण चव्हाण (वय-18), आकाश भरत पवार (वय-23), अमोल वसंत चोरघडे (वय-30) यांना अटक केली आहे. तर अक्षत तापकिर, राहुल बारवसे व इतरांवर आयपीसी 307, 326, 324, 143, 144, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अनुज, हरिकेश व आकाश हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ पाडळे याचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाश पवार याच्यासोबत वाद
झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी सोरभ दिगंबरनगर येथे गेला होता.
त्यावेळी आकाश पवार याने सौरभ याच्या कानाखाली मारली.
तर अनुज यादव याने त्याच्याकडे असलेल्या धारदार कोयत्याने ऋषिकेश याला जीवे मारण्याच्या (Attempt to Kill)
उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तर इतर आरोपींनी शिवागाळ करुन ‘याना कोणालाच सोडू नका’ असे म्हणून रस्त्यावर पडलेले दगड व विटांनी मारहाण केली.

तसेच सौरभ याचा मित्र अभि आगरकर व योगेश हे दोघे ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्यावर
देखील हल्ला करुन कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. दरम्यान, त्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली.
आरोपींनी लोकांकडे हातातील कोयते दाखवून ते हवेत फिरवून कोण मध्ये आला तर सोडणार नाही, अशी धमकी
देत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे (API Ghorpade) करीत आहेत.

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, 6 जणांवर FIR; वारजे पोलिसांकडून 4 जणांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article