Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | कामावरुन काढून टाकणार असल्याचे सांगितल्याने चालकाने मालकावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Pimpri Chinchwad Crime News | कामावरुन काढून टाकणार असल्याचे सांगितल्याने चालकाने मालकावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आयशर टेम्पोचे नुकसान केल्याने कामावरुन काढून टाकणार असल्याचे मालकाने सांगितले. त्यावरुन चालकाने मालकावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या घटनेत ट्रकमालक शिवाप्पा आडागळे (वय ४२, रा. आदर्शनगर कॉलनी, किवळे) हे जखमी झाली आहेत. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर गायकवाड (रा. डुडुळगाव, आळंदी रोड, मोशी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भूमकर चौकात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे ३ आयशर टेम्पो असून मागील ३ वर्षांपासून दिगंबर गायकवाड हा त्यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी त्याने आयशर टेम्पोचा अचानक अडवान्स गिअर टाकून गाडीचे इंजिनचे नुकसान केले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला कामावरुन काढून टाकण्याचे ठरविले. हे त्याला समजल्यावर तो एक टेम्पो घेऊन गेला तो परत आला नाही. म्हणून फिर्यादी यांनी त्याला फोन केला, तेव्हा त्याने मी गाडी घेऊन येत नाही तुम्हाला येऊन भेटतो, असे सांगितले.

सायंकाळी ७ वाजता दिगंबर गायकवाड याने कॉल करुन दत्ता करमले याच्या गॅरेजमध्ये बोलावल्याने ते गेले.
तेथून तो आयशर टेम्पो घेऊन जात असल्याने फिर्यादी यांनी त्याला विरोध केला.
तेव्हा गायकवाड याने फिर्यादी यांच्या डोक्यात टोकदार शस्त्राने मारले.
त्यावेळी दत्ता करमले व कामगार सुनिल आण्णा यांनी भांडणे सोडविली.
फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघाले. वाटेत ट्राफिक जाम असल्याने ते भूमकर चौकाजवळ थांबले होते.
त्यावेळी गायकवाड हा तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्या पाठीत, मानेवर व डोक्यात टोकदार शस्त्राने वार करुन जबर
जखमी करुन त्यांना गंभीर जखमी केले. तेथील लोकांनी फिर्यादी यांना गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
फिर्यादी यांच्यावर तेथे उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांडे (PSI Srikishan Kande) तपास करीत आहेत.

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | कामावरुन काढून टाकणार असल्याचे सांगितल्याने चालकाने मालकावर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article