Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime News | नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीची धडक लागल्याने तरुणीने नुकसान भरपाई मागितली. याचा राग आल्याने तरुणीसोबत अश्लील बोलून विनयभंग (Molestation) केल्याची घटना पुण्यातील निलायम ब्रिज (Nilayam Bridge) येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे. हा प्रकार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.20) पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिपक शिवाजी अमराळे Deepak Shivaji Amarale (वय-36 रा. साईकृपा बिल्डींग, वडगाव बुद्रुक) याच्यावर आयपीसी 354, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी निलायम ब्रिज येथील सार्वजनिक रोडवरुन तिच्या दुचाकीवरुन जात होती.
त्यावेळी आरोपी दिपक अमराळे याच्या दुचाकीची धडक तरुणीच्या दुचाकीला बसली.
यामध्ये तिच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यामुळे तिने आरोपीकडे नुकसान भरपाई मागितली.
याचा राग आल्याने आरोपीने मी वकील (Lawyer) आहे असे बोलून मुलीला शिवीगाळ करत धमकी दिली.
तसेच अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article