Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मित्राचा खून, बालेवाडी येथील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मित्राचा खून, बालेवाडी येथील घटना

Murder Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन हत्याराने वार करुन तरुणाचा खून (Murder) केल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.19) रात्री साडे अकरा ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान बालेवाडी येथील गोल्डन टेरेस सोसायटीजवळ (Golden Terrace Society) असलेल्या मोकळ्या जागेत घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

राजेश कांबळे (वय-25 रा. बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 17 वर्षीय युवकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल शेषराव रिकामे (वय-20 रा. बालेवाडी), सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नुर (वय-20 रा. बालेवाडी) यांच्यावर आयपीसी 302, 201, 506 (2), 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल रिकामे व मयत राजेश हे एकमेकांचे मित्र आहेत.
तर फिर्यादी तरुण आरोपीचा ओळखीचा आहे. राहुल रिकामे याच्या बहिणीशी राजेश कांबळे या तरुणाचे
अनैतिक संबंध असल्याचा संशय राहुल याला होता.
या संशयावरून आरोपींनी राजेश याला बालेवाडीच्या गोल्डन टेरेस सोसायटी जवळ भेटायला बोलावले.
त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखम होऊन राजेशचा मृत्यू झाला. आरोपींनी राजेश याचा खून करून त्याची दुचाकी वाकडच्या नदीमध्ये फेकून देऊन पुरावा नष्ट केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (API Rajkumar Kendre) करीत आहेत.

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मित्राचा खून, बालेवाडी येथील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article