Header

ACB Trap News | 5 लाखाच्या लाचेची मागणी ! फोन पे वर लाच स्वीकारताना पुण्यातील वकील अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | 5 लाखाच्या लाचेची मागणी ! फोन पे वर लाच स्वीकारताना पुण्यातील वकील अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Accepting Bribe Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ACB Trap News | पोलिसांना सांगून गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील असे सांगून महिलेकडून लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe on Phone Pay) एका वकिलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुमित नामदेवराव गायकवाड (वय-25 रा. सेवागिरी निवास, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.10) केली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत 25 वर्षीय महिलेने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. एसीबीच्या पथकाने 3, 4 आणि 8 जानेवारी रोजी पडताळणी करुन बुधवारी (दि.10) ही कारवाई केली. तक्रारदार ह्याचे व्यक्तिगत अडचणीमुळे पोलीसांनी तक्रारदार यांच्या दोन मित्रांना कोथरुड येथील शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे घेवून गेले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मित्राच्या ओळखीचे वकील सुमित गायकवाड याने तक्रारदार यांच्यावर व दोन्ही मित्रावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतो असे सांगून 5 लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर अ‍ॅड. सुमित गायकवाड याने तक्रारदार यांचेकडून एक लाख रुपये व तक्रारदार यांच्या मित्रांकडून फोन पे द्वारे
55 हजार रुपये असे एकुण 1 लाख 55 हजार रुपये घेतले होते. तसेच उर्वरित रक्कम देत नाही तोपर्यंत तक्रारदार ह्यांचा विरुद्ध असलेला पुरावा मी नष्ट करणार नाही, असे सांगून अजून रुपये 3 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्यालयात दिली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, खाजगी इसम अ‍ॅड. सुमित गायकवाड याने तक्रारदार यांच्याकडे
व त्यांच्या मित्राला कोथरुड पोलिसांकडून सोडविण्यासाठी तसेच तकारदार यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल
न करण्यासाठी साडे तीन लाख रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
त्यापैकी 20 हजार रुपये फोन पे द्वारे त्याच्या अकाऊंट मध्ये मागणी करुन पोलिसांसाठी लाच स्विकारली.
आरोपी अ‍ॅड. सुमित गायकवाड याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7(अ) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहायक पोलीस फौजदार मुकुंद अयाचित,
पोलीस अंमलदार शिल्पा तुपे, वनिता गोरे, चालक अविनाश चव्हाण, चालक दिपक काकडे यांच्या पथकाने केली.

The post ACB Trap News | 5 लाखाच्या लाचेची मागणी ! फोन पे वर लाच स्वीकारताना पुण्यातील वकील अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article