Header

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, आरोपींचं ‘मुळशी कनेक्शन’ उघड

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, आरोपींचं ‘मुळशी कनेक्शन’ उघड

Sharad Mohol Dead In Firing

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sharad Mohol Murder Case | पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याचा कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी (5) गोळ्या झाडून खून करण्यात आला. शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक केली आहे. आरोपींनी मुळशी तालुक्यातील दोन ते तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

धनंजय मारुती वटकर (वय-25 रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय-28 रा. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे करीत आहेत. आरोपींना पिस्तुल कोणी पुरवले याचा शोध घेण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार साहिल पोळेकर आणि साथीदारांना वटकर आणि शेडगे यांनी पुस्तुले पिरविल्याचे समोर आले. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना बुधवारी (दि.10) अटक केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय-20 रा. शिवशक्ती नगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महीपती कानगुडे
(वय-35 रा. भुगाव ता. मुळशी), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय-24 रा. स्वराज्य मित्र मंडळ, पर्वती),
चंद्रकांत शाहु शेळके (वय-22 रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गाव्हणकर (वय-20 रा पौड, ता. मुळशी),
विठ्ठल किसन गांदले (वय-34 रा. शिवकल्याण नगर, सुतारदरा, कोथरुड), अ‍ॅड. रविंद्र वसंतराव पवार
(वय-40 रा. नांदेगाव ता. मुळशी), अ‍ॅड. संजय रामभाऊ उडान (वय-43 रा. भुसारी कॉलनी, कोथरुड) यांना अटक
करण्यात आली आहे. अ‍ॅड. पवार आणि अ‍ॅड. उडान यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश मंगळवारी (दि.9)
देण्यात आले आहेत. तर इतर आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची
वाढ करण्याचे आदेश दिले.

The post Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, आरोपींचं ‘मुळशी कनेक्शन’ उघड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article