Header

Pune Hinjewadi Crime News | नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Pune Hinjewadi Crime News | नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Drugs Racket

पिंपरी : Pune Hinjewadi Crime News | नालासोपारा येथून नायजेरियन नागरिकाकडून अमली पदार्थ (Drugs Racket) आणून हिंजवडीमध्ये त्याची विक्री करताना पोलिसांनी दोघांना पकडले. (Pune Hinjewadi Crime)

इम्रान चाँद शेख (वय ३२, रा. मिठानगर, कोंढवा) आणि समीर शहाजहान शेख (वय ४०, रा. माहिम, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६५ ग्रॅम मेफेड्रान (एम डी), मोटारसायकल, रोख रक्कम, तीन मोबाईल असा ७ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक अजित लिंबराज कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक हिंजवडी परिसरात रात्री गस्त घालत असताना त्यांना मुंबई -बेंगलुरु महामार्गावरील भुजबळ चौकात दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सोनम हॉटेलसमोर दोघे जण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असताना त्यांच्याकडे ६५ ग्रॅम एम डी आढळून आला. त्याबाबत चौकशी केल्यावर इम्रान शेख याने समीर शेख याच्या ओळखीतून नालासोपारा येथील एका टोनी नावाच्या नायजेरियन नागरिकाकडून हे अंमली पदार्थ घेतल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक खटाळ तपास करीत आहेत.

The post Pune Hinjewadi Crime News | नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article