Header

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Sharad Mohol Murder Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sharad Mohol Murder Case | गँगस्टर शहर मोहोळ याच्यावर गोळीबार करणारा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर (Sahil alias Munna Polekar) याने मामाच्या वादाचा बदला घेण्यासाठी खून केल्याचा दावा पोलिसांना (Pune Police) संशयास्पद वाटत असतानाच त्याने गोळीबार केल्यानंतर शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मोहोळ खून प्रकरणात मुख्य सुत्रधार कोण आहे, संबंधित गुंड मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) सामील आहे का यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

शरद मोहोळ याचा खून करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या ६ जणांना १० जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

त्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची पुन्हा पुन्हा तपासणी केली गेली. शरद मोहोळ याच्याबरोबर असलेल्यांकडून घटनेतील बारीकसारीक तपशिल गोळा केले. त्यात मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडताना पोळेकरने शहरातील गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचे उघडकीस आले. पोळेकरने गुंडाच्या नावाने घोषणा दिल्या, तसेच मोहोळ खून प्रकरणात गुंड सामील आहे का?, त्याने पोळेकरला सुपारी दिली का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

त्यादृष्टीने मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी पुन्हा त्याला हजेरी देण्यास बोलावण्यात आले आहे. त्यामुळे शरद मोहोळ याच्या खूनामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता बोलली जात आहे.

The post Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article