Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या 32 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार (Pune Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2023 या कालावधीत कात्रज, गोवा (Goa) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 32 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन समित उमेश सोनवणे Samit Umesh Sonwane (वय-31) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, समित आणि पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. चॅटींग करत असताना त्यांचे सूत जुळले. आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच गोवा येथे फिरण्यास नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता समित याने
लग्न करण्यास टाळाटाळ करुन अद्यापर्यंत लग्न केले नाही,
असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
- Diet For Thyroid | तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर कधीही खाऊ नका हे 5 प्रकारचे पदार्थ, आजपासूनच त्यांच्यापासून राहा दूर…
- Benefits Of Ginger In Winter | हिवाळ्यात अशा प्रकारे आले खाल्लास हे आजार राहतील दूर, जाणून घ्या फायदे…
- Winter Ear Pain | हिवाळ्यातच का होते कानदुखीची समस्या? एक्सपर्टकडून जाणून घ्या कारण
- Herbal Tea For Winter | हिवाळ्यात प्या चहाचे हे ५ प्रकार, तुमचे शरीर ठेवते गरम
- गुडघेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर करा ‘या’ उपायांचा अवलंब..
- Room Heater Side Effects | हिवाळ्यात रूम हीटर वापरा जपून, नाहीतर एका चूकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव…
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना appeared first on बहुजननामा.