Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी नेले. त्याठिकाणी तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Pune Minor Girl Rape Case) ठेवले. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालवधीत एरंडवणे व कोंढवा येथील मित्राच्या रुमवर घडला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) सोमवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन अतिष शिंदे Atish Shinde (वय-20 पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376, 366, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतिष शिंदे याने पीडित मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कोंढवा
येथील मित्राच्या रुमवर नेले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने
शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर आई-वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडकर (PSI Deepak Khedkar) करीत आहेत.
- Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, बच्चन सिंग, श्रवण दत्त यांचा समावेश
- ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित
- Diet For Thyroid | तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर कधीही खाऊ नका हे 5 प्रकारचे पदार्थ, आजपासूनच त्यांच्यापासून राहा दूर…
- Benefits Of Ginger In Winter | हिवाळ्यात अशा प्रकारे आले खाल्लास हे आजार राहतील दूर, जाणून घ्या फायदे…
- Winter Ear Pain | हिवाळ्यातच का होते कानदुखीची समस्या? एक्सपर्टकडून जाणून घ्या कारण
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on बहुजननामा.