Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पंचकर्म मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पंचकर्म मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

Ayurvedic Massage Center Sex Racket

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) पथकाने पंचकर्म क्लिनिक या मसाज सेंटरच्या (Panchakarma Clinic Massage Center) नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित चार तरुणींकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करुन घेत होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्या मदन मंडले (रा. मार्केटयार्ड, पुणे), कौशल्या सहदेव लोंढे (वय-33 रा. वडगाव बु., पुणे) यांच्यावर आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करुन कौशल्या लोंढे हिला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडे चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शिवांजली पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटर (Shivanjali Panchakarma Massage Center) येथे केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये असलेल्या शिवांजली पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटर येथे वेश्याव्यवसाय
सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. पंचकर्म मसाज सेंटरच्या नावाखाली
हा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या घटनेची पुष्टी केली आहे.
त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
आरोपी चार तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर
स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक ढमढेरे (PI Dhamdhere) करीत आहेत.

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पंचकर्म मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article