Header

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळयांपैकी एक गोळी शरद मोहोळ याला लागल्याची प्राथमिक माहिती असून मोहोळ याला सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. (Firing On Sharad Mohol In Kothrud Pune )

शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ याच्याविरूध्द अनेक गंभीर गुन्हयांची नोंद पुण्यातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात आहे. दरम्यान, काही गुन्हयांमध्ये न्यायालयाने मोहोळ याची निर्दोष मुक्तता देखील केली आहे. (Firing On Sharad Mohol In Kothrud Pune )

अलिकडील काळात शरद मोहोळने अनेक सामाजिक कार्यक्रम देखील घेतले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अचानकपणे मोहोळवर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमी झालेल्या मोहोळला सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम करीत असून हल्लेखोरांबाबत माहिती मिळवत आहेत.

The post Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article