Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime News | पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना

murder

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पैसे चोरल्याच्या संशयावर एका व्यक्तीला गुप्तांगावर तसचे छातीवर बेदम मारहाण (Beating) करुन खून (Murder) केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.3) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

संदिप राजाराम पाटील (वय-42 रा. पाण्याच्या टाकीजवळ, महादेव नगर, हिंगणे खु.) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रसाद गोपाळ कारेकर (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अस्मिता बाळासो लाड PSI Asmita Lad (वय-36) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद याची टपरी असून तो चोरून दारु विकतो. त्याला यापूर्वी तडीपार (Tadipaar)
करण्यात आले होते. संदीप त्याच्याकडे कचरावेचक म्हणून कामाला होता.
संदीप याने पैसे चोरल्याच्या संशयावरुन कारेकर याने बुधवारी दुपारी संदीपच्या छातीवर आणि गुप्तांगावर
लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर कोसळला.

त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर संदीप उठत नसल्याने प्रसादने त्याला रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिसांनी आरोपी प्रसाद कारेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) करीत आहेत.

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | पैसे चोरल्याच्या संशयावरून कामगाराचा खून, एकाला अटक; वडगाव मधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article