Header

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदिवसा ‘गेम’

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदिवसा ‘गेम’

Sharad Mohol Dead In Firing

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळची भरदिवसा गेम झाली आहे. त्याच्यावर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळचा अखेर मृत्य झाला आहे. त्याला पुणे शहर पोलिस दलातील अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. (Sharad Mohol Dead In Firing)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

3-4 हल्लेखोरांना अगदी जवळून शरद मोहोळवर गोळीबार केला होता. गोळया अगदी जवळून झाल्याने मोहोळ अंत्यत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Sharad Mohol Dead In Firing)

मोहोळवर नेमका कोणी गोळीबार केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही मात्र गेल्या अनेक दिवसांपासुन शरद मोहोळ सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाला होता. राजकारणात येण्याची त्याची इच्छा देखील होती असे त्याचे निकटवर्तीय सांगतात.

शुक्रवारी दुपारी दीड वाजण्यच्या सुमारास मोहोळवर गोळया झाडण्यात आल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा मृत्यू झाला आहे. या वृत्तास पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दुजारा दिला आहे.

खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे मोहोळविरूध्द दाखल होते. काही गुन्हयात त्याची निर्दोष सुटका देखील झाली होती.

The post Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदिवसा ‘गेम’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article