Header

नांदेड कोरोनामुक्तीकडे; 24 तासांत एकही नवीन रुग्ण नाही, मृत्यू नाही

नांदेड कोरोनामुक्तीकडे; 24 तासांत एकही नवीन रुग्ण नाही, मृत्यू नाही

corona

दीड वर्षापासून कोरोनाच्या मगरमिठीत अडकलेल्या नांदेडकरांनी मंगळवारी मोकळा श्वास घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने घेतलेले कठोर परिश्रम, नागरिकांनी त्याला मनापासून दिलेला प्रतिसाद यामुळेच गेल्या 24 तासांत जिल्हय़ात एकही नवा रुग्ण आढळला नाही आणि कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

तब्बल 16 महिन्यांपासून नांदेड कोरोनाच्या कराल दाढेत गुदमरले होते. दररोज आढळणारे रुग्ण, मृत्यूचा वाढणारा आकडा यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारीही चिंताक्रांत होते, परंतु जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कोरोनाचा मोठय़ा हिमतीने मुकाबला केला. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. व्यापाऱयांनीही कडक निर्बंधांचे पालन करून संयमाचे दर्शन घडवले. परिणामी कोरोना नियंत्रणात आला. गेल्या 24 तासांत आरोग्य विभागाने 1492 अहवाल तपासले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article