36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर विख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने निवृत्त
प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे 36 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. बीड येथील अंबाजोगाई येथे अधिव्याख्याता म्हणून 1985 साली सुरू झालेल्या कारकीर्दीत त्यांनी सर जे. जे. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुखपदापासून अधिष्ठाता पदापर्यंत त्याचप्रमाणे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱया पार पाडल्या. या जबाबदाऱया पार पाडत असतानाच लाखो रुग्णांवर मोतिंिबंदू शस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्य पुन्हा प्रकाशमान केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात जाऊन अंधत्व निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य डॉ. लहाने यांनी केले आहे. आदिवासी व ग्रामीण भागामध्ये जाऊन शस्त्रक्रियेची शिबिरे घेऊन अंधत्व निवारण करण्याचे काम गेली 25 वर्षे अविरतपणे सुरू आहे. आजपर्यंत 667 शिबिरांमधून 30 लाखांच्यावर रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. आजपर्यंत 50 लाख रुग्णांवर तपासणी व उपचार करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण सहसंचाल व त्यानंतर संचालकपदाची जबाबदारी पार पाडताना परिचारिकांची भरती, वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱयांची पदोन्नती तसेच संचालक म्हणून बारामती, नंदूरबार येथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचप्रमाणे सातारा, अलिबाग व सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे मानले जातात. कोरोनाकाळातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडाली. कोविड-19 चा प्रादुर्भाव उद्भवल्यानंतर कोविड 19 चे नोडल अधिकारी म्हणून मनुष्यबळासाठी आवश्यक असणारे डॉक्टर्स त्यामध्ये खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स, रेसिडेंट डॉक्टर्स, बंधपत्रित डॉक्टर्स यांना आदेश देऊन त्यांची नियुक्ती आवश्यकतेनुसार ग्रामीण व शहरी भागामध्ये करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.
वैद्यकीय शिक्षण संचालक या पदावरून आज निवृत्त होत आहे पण शासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही पुढील काळात माझे अंधत्व नियंत्रणाचे व नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रीयेचे काम कायम सुरू राहील. 36 वर्षे अविरतपणे रुग्णसेवा केली. अनेकांना नवी दृष्टी दिली. माझा नेत्रयज्ञ यापुढेही अखंडपणे सुरू राहील.