मुंबईत लस तुटवडय़ामुळे आज लसीकरण बंद
पुरेशा लससाठय़ाअभावी उद्या, गुरुवार 1 जुलैला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे. कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेअंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे. लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्याअनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकरांना सातत्याने माहिती दिली जाईल. लससाठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.