Header

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची फी माफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची घोषणा

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची फी माफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची घोषणा

uday-samant

कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्याचप्रमाणे विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आकारण्यात येणारे इतर शुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाची लागण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. त्यांच्या पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये

  • जिमखाना, विविध उपक्रम, कॉलेज मॅगझिन, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, यूथ फेस्टिव्हल शुल्क माफ
  • प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल तसेच ग्रंथालयामध्ये ई-कन्टेन्ट विकत घेण्यासाठी
    खर्च करण्यात आला

असल्याने शुल्कामध्ये 50 टक्के सवलत

  • वसतिगृह शुल्क पूर्णपणे माफ
  • विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये
  • शिक्षण शुल्क व विकास निधीमध्ये सवलत
  • जिमखाना शुल्क, विविध उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी

यूथ फेस्टिव्हल शुल्क पूर्णपणे माफ

 प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्कात 50 टक्के सूट

युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

कोरोना काळात बहुतांश शिक्षण हे ऑनलाइनच असल्याने पारंपरिक अभ्यासक्रम चालवणाऱया महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधांचा वापर केलेला नाही. त्यामुळे इंजिनीयरिंग महाविद्यालयांच्या धर्तीवर त्यांनाही त्यावरील शुल्कात सवलत देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली होती. त्यासंदर्भातील निवेदन शिवसेना सचिव सूरज चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी उदय सामंत यांना दिले होते. त्यानंतर सामंत यांनी शुल्क सवलतीची घोषणा केली.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article