Header

सोनाली कुलकर्णीचा देसी गर्ल अवतार, जम्मूत करतेय चित्रपटाचे शूटिंग

सोनाली कुलकर्णीचा देसी गर्ल अवतार, जम्मूत करतेय चित्रपटाचे शूटिंग

sonali-kulkarni-2-new

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मे महिन्यात दुबईत मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर सोनाली पुन्हा हिंदुस्थानात परतली असून तिने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला जम्मूमध्ये सुरुवातदेखील केली आहे. ‘मेरे देश की धरती’ अशी कॅप्शन देत तिने आपल्या ‘देसी गर्ल’ अकतारातील काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. बऱयाच दिवसांनी हिंदुस्थानात परतल्याचा आणि पुन्हा कामाला सुरुवात केल्याचा आनंद तिने पोस्टमधून व्यक्त केला आहे. सोबतच #indopakborder #specialfilm #jammu असे हॅशटॅग तिने वापरले आहेत. एकंदरीत हा देशभक्तीपर चित्रपट असल्याचा अंदाज आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article