Header

हिंदुस्थानच्या श्रीहरी नटराजचा जलतरणात सूर, टोकियो ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

हिंदुस्थानच्या श्रीहरी नटराजचा जलतरणात सूर, टोकियो ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

shree-hari-natraj

हिंदुस्थानचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने अखेर बुधवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी अधिकृतपणे पात्रता मिळवली. रोममधील सेटे कोली ट्रॉफी स्पर्धेतील पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रीहरीला ‘फिना’ संस्थेने ‘अ’ पात्रता गटात मान्यता दिली.

हिंदुस्थान जलतरण महासंघाने (एसएफआय) ट्विटरवर ही माहिती दिली. श्रीहरी नटराजने सेटे कोली ट्रॉफी या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 53.77 सेपंद वेळ नोंदवीत ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश हे दोन जलतरणपटू टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील. हिंदुस्थानच्या दोन जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये थेट पात्रता मिळविण्याची ही पहिलीच वेळ होय. साजन प्रकाश प्रकार 200 मीटर बटरफ्लायमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्रीहरी नटराज प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असून साजन प्रकाश दुसऱयांदा या क्रीडा महापुंभात खेळणार आहे. 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्येही साजन प्रकाशने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते.

दुती चंदला ऑलिम्पिकचे तिकीट

हिंदुस्थानची स्टार धावपटू दुती चंद हिने बुधवारी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. जागतिक क्रमवारी कोटय़ानुसार तिला ऑलिम्पिकची पात्रता मिळाली. 100 मीटरसाठी 22, तर 200 मीटरसाठी 15 ऑलिम्पिक कोटा शिल्लक होता. दुती चंद ही जागतिक क्रमवारीत 100 मीटरमध्ये 44व्या, तर 200 मीटरमध्ये 51व्या स्थानी होती. त्यामुळे या दोन्ही स्पर्धेसाठी दुती चंदला ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. मात्र याच क्रमवारी कोटय़ानुसार हिमा दास ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकली नाही. मागील आठवडय़ात पटियाला येथे झालेल्या इंडियन ग्रां.प्री. स्पर्धेत दुती चंदने 11.17 सेपंद वेळ नोंदवीत राष्ट्रीय विक्रम केला होता. मात्र ऑलिम्पिक पात्रता निकषाने तिला 0.02 सेपंदाने हुलकावणी दिली होती.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article