Header

गोव्यातील ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात

गोव्यातील ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात

1624980500146

गोव्यात येणाऱया पर्यटकांना आणि नशेबाजांना ड्रग्ज पुरवणाऱयारोकी फर्नांडिस, ओनायेका ईगीके, चिडी ओसीता ओकोनवो ऊर्फ बेंजामिन यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने अटक केली. ओनायेका हा पेडलरला ड्रग्ज देण्यापूर्वी पासवर्ड विचारत असायचा. पासवर्डनंतर तो ड्रग्ज देत असल्याचे तपासात समोर आले.

झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. उत्तर गोव्यातील अंजुना येथे रोकी फर्नांडिस याच्याकडून एनसीबीने 340 ग्रॅम नेपाळी चरस जप्त केले. त्याच्या चौकशीत चिडी ओशिता ओकॉनवो ऊर्फ बेंजामिनचे नाव समोर आले. त्याच्याकडून एनसीबीने 23 टॅबलेट एमडीएमएच्या जप्त केल्या आहेत.

रोकी हा उत्तर गोव्यातील मुख्य पेडलर आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी एनसीबीने रोकीला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर रोकी हा पुन्हा ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय झाला. रोकीचे उत्तर गोव्यात एक आईस्क्रीम पार्लर आहे. त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये येणाऱया नशेबाजांना रोकी हा ड्रग्ज विकायचा. ड्रग्जचे पैसे तो ऑनलाइन ई वॉलेटवरून घेत असायचा. रोकी हा पर्यटकांनादेखील ड्रग्ज पुरवत होता.

एनसीबीने उत्तर गोव्यातून ओनायका ईगीके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 20 ब्लॉट्स एलएसडी जप्त केले आहेत. ओनायका हा ड्रग्ज देण्यापूर्वी पासवर्ड विचारत असायचा. पोलीस किंवा एनसीबीने पकडू नये म्हणून तो ड्रग्ज घेणाऱया ग्राहकांना ठिकाणे बदलून भेटायला बोलवायचा. ओनायकाविरोधात दोन वर्षांपूर्वी ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article