Header

कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; महापालिका कर्मचाऱ्यांना इशारा

कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; महापालिका कर्मचाऱ्यांना इशारा

corona-vaccine-in-mumbai

पिपंरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील, ठेकदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अद्यापि कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित ठेवण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात 7 हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. कोरोना प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे, कोरोनापासून संरक्षण मिळावे या करिता विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याबाबत तीन वेळा कळविले आहे. तरीही अद्यापपर्यंत बहुतांशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, मानधनावरील, ठेकदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जर कोरोना लस घेतली नसेल तर त्यांनी ते 20 जुलैपर्यंत घ्यावेत अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल असा इशारा राजेश पाटील यांनी दिला आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article