अण्णा नाईक परत येणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घातलेल्या निर्बंधांमुळे शूट बंद असल्याने ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका काही दिवस प्रसारित झाली नव्हती. मात्र लवकरच शूटिंगला सुरुवात होऊन पुढील महिन्यापासून ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणाला, ‘‘कोकणात सध्या प्रचंड पाऊस सुरू असल्यामुळे पाकसाचा व्यत्यय आहेच; पण रात्रीस खेळ चाले ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. तिसऱया पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळं लोकांना बरेच प्रश्न पडले आहेत. ज्या अण्णा-शेवंताला लोकांनी डोक्यावर घेतलं ते आता भूतांमध्ये सामील झाले आहेत. ते नेमकं काय करणार आहेत, वाडय़ाची वाटणी होईल की तो विकला जाईल आदी प्रश्नांची उत्तरे रंजकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’