Header

आक्षेपार्ह अवस्थेत आढळले प्रेमी युगुल, ग्रामस्थांनी व्हिडीओ काढून दिला चोप

आक्षेपार्ह अवस्थेत आढळले प्रेमी युगुल, ग्रामस्थांनी व्हिडीओ काढून दिला चोप

bihar-couple-beating

बिहारमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाला ग्रामस्थांनी शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ग्रामस्थांनी त्यांचा व्हिडीओ काढून त्यांना जबर मारहाण केली आहे. दोघेही अल्पवयीन आणि वेगवेगळ्या जातीचे असल्याचे समोर आले आहे.

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचे मिर्झापूर जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत प्रेम संबंध होते. मुलगा स्त्रियांच्या श्रृंगाराच्या वस्तू विकण्यासाठी गावोगावी फिरत असे. तेव्हा त्याची आणि समस्तीपूर जिल्ह्यातील या मुलीशी ओळख झाली. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. परंतु दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते, म्हणून दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

दोघेही मंगळवारी समस्तीपूरमध्ये एका मकईच्या शेतात भेटले. तेव्हा काही ग्रामस्थांना त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. तेव्हा काही तरुणांनी त्यांचे व्हिडीओ काढले आणि बांबूच्या झाडांना बांधले. ग्रामस्थांना दोघांना जबर मारहाण केली आणि पंचायतची बैठक बोलावली.

एक पक्ष दोघांचे लग्न लावावे अशी मागणी करत होते, परंतु दोघेही विभिन्न जातीचे असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. अखेर मुलाला आर्थिक दंड आकारून दोघांना सोडून देण्यात आले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article