Header

थ्रीडी तंत्रज्ञानामुळे विज्ञान-गणित झाले सोपे!

थ्रीडी तंत्रज्ञानामुळे विज्ञान-गणित झाले सोपे!

3d-cardiac-1920x1080

मुलांच्या मनात सर्वाधिक भीती असते ती विज्ञान आणि गणित या विषयांची. मात्र हिंदुस्थानात नुकत्याच दाखल झालेल्या ‘जीनियस थ्रीडी लर्निंग’ या टेक्नॉलॉजीमुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता दुप्पट वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.

‘सरस थ्रीडी’ या अमेरिकन कंपनीने विज्ञान व गणित विषयांचे सखोल आकलन होण्यासाठी स्टिरिस्कोपिक थ्रीडी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा आणली आहे. सीबीएससी, आयसीएसई, एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच जेईई आणि नीटसाठीसुद्धा ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. याबाबत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन दामा म्हणाले, ‘‘जीनियस थ्रीडीमुळे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळेल. जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे.’’ यामध्ये तज्ञ शिक्षकांनी दिलेले थ्रीडी लेक्चर, थ्रीडी मॉडेल्स, सिम्युलेशनसारख्या सुविधा आहेत. यामध्ये शेवटी प्रश्नोत्तरे, सारांश, सिद्धांत अहवाल एकत्रित करण्याची सुविधा दिली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article