‘विज्ञानवादी सावरकर’ उलगडणार, मराठी विज्ञान परिषदेतर्फे ऑनलाइन व्याख्यान
देशभक्त, कवी, लेखक अशी वीर सावरकरांची विविध रूपे सर्वांना परिचित असूनही तुलनेने त्यांचे विज्ञानविषयक विचार दुर्लक्षित राहिले. सावरकरांनी बोटीतून समुद्रात उडी घेतलेल्या पराक्रमदिनाचे औचित्य साधत मराठी विज्ञान परिषदेने ‘विज्ञानवादी सावरकर’ या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. गिरीश पिंपळे (नाशिक) हे 7 जुलै 2021 ला संध्याकाळी 6 वाजता होणाऱया ऑनलाइन कार्यक्रमात व्याख्यान देतील. विनामूल्य आणि सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आणि नोंदणीसाठी पुढील लिंक पाहावी https://ift.tt/3qAEnrR