Pune Police News | BHR घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार जितेंद्र कंडारेला अटक; पुणे पोलिसांनी इंदूर येथून घेतलं ताब्यात

पुणे न्युज (Pune News) : – BHR | बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणातील (Bhaichand Hirachand Raisoni Scam) प्रमुख सुत्रधार जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा. शिवाजीनगर, जळगाव) (Jitendra Gulabrao Kandare)
याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (economic offences wing pune) पथकाने सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक (Arrest) केली आहे.
जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) याला शासनाने बीएचआर पतसंस्थेवर आवसायक म्हणून नेमणूक केली होती. त्याने पतसंस्थेतील कर्ज वसुल करुन मालमत्तेचा लिलाव करुन ते पैसे ठेवीदारांना व देणेदारांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, त्याने इतरांना हाताशी धरुन ठेवीदारांची फसवणूक करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला होता.
ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन २५ नोव्हेंबर २०२० रोजी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. २६ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांनी (Pune Police) जळगावात एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाई केली. मात्र, तत्पूर्वीच आवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हे फरार झाले होते. त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर जितेंद्र कंडारे हा फरार झाला होता. गेले ७ महिने पोलीस त्याच्या मागावर होते.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांना कंडारे हा इंदूर येथील एका नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पुण्यातून एक पथक तातडीने इंदूरला रवाना झाले.
या पथकाने सोमवारी रात्री ९ वाजता कंडारे याला पकडले आहे.
हे पथक कंडारेला घेऊन पुण्यात पोहोचणार आहे. या गुन्ह्यातील कंडारे याचा साथीदार सुनील झंवर अद्यापही फरार आहे.
याच गुन्ह्यांत गेल्या पंधरवड्यात भागवत भंगाळे, प्रेम कोगटा, जयश्री तोतला, जयश्री मणियार, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे यांच्यासह बड्या ११ कर्जदारांना अटक झाली होती. हे सर्व संशयित पुणे कारागृहात आहेत
web title :Pune Police News | BHR scam mastermind Jitendra Kandare arrested; Pune police took him into custody from Indore.
Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी
Uday Samant । 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार
The post Pune Police News | BHR घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार जितेंद्र कंडारेला अटक; पुणे पोलिसांनी इंदूर येथून घेतलं ताब्यात appeared first on बहुजननामा.