Header

23 वारकऱयांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, बंडातात्या कराडकर स्थानबद्ध

23 वारकऱयांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, बंडातात्या कराडकर स्थानबद्ध

banda-tatya

कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी सरकारने आषाढी पायी वारीवर निर्बंध आणले. समस्त वारकऱयांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. दोन दिवसांपूर्वीच आळंदी येथे 23 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते; मात्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करण्याचा इशारा देत आज आळंदीहून पायी वारी सुरू केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बंडातात्या यांना ताब्यात घेतले. कोरोना नियमावलीचे पालन करण्याची विनंती केली. अखेर पोलिसांनी बंडातात्यांना सातारा जिह्याच्या हद्दीत सोडले. त्यांना कराड तालुक्यातील करवडी येथील त्यांच्या श्रीकृष्ण गोपालन पेंद्र येथे स्थानबद्ध केले आहे.

कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडत पोलिसांनी वारकऱयांची समजूत घातली. त्यानंतर बंडातात्या यांनी पायी जाण्याचा संकल्प रद्द केला. तसेच आपण सातारा येथे जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बंडातात्या यांना मोटारीतून सातारा येथे सोडले.

दरम्यान, आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाण्यासाठी बंडातात्या कराडकर शुक्रवारीच आळंदीत आले होते. आज सकाळी ते पायी निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बंडातात्या यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी पायी जाण्याचा संकल्प रद्द केला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी सातारा येथे सोडले, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले.

n ह.भ.प. बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदी येथे दाखल झाले. शनिवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेऊन चऱहोलीतील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात नजरपैदेत ठेवले. मात्र बंडातात्या यांच्या समर्थक वारकऱयांनी पोलिसांची गाडी अडवली. तसेच आम्ही पायी पंढरपूरला जाणार, अशी भूमिका घेतली.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article