Header

पश्चिम रेल्वेची कोरोनातही 3 हजार कोटींहून अधिक कमाई

पश्चिम रेल्वेची कोरोनातही 3 हजार कोटींहून अधिक कमाई

western-railway-1

पश्चिम रेल्वेने सध्याच्या कसोटीच्या काळातही आपली घोडदौड कायम सुरू ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात कोविड साथीमुळे मनुष्यबळाची अतिशय कमतरता असतानादेखील पश्चिम रेल्वेने 3100 कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त करून आघाडी घेतली आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वेने ही कामगिरी केली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित पडू नये यासाठी कोरोना काळात रेल्वेने देशभर मालगाडय़ा आणि पार्सल गाडय़ा सुरू ठेवल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी वेळोवेळी प्रवासी आणि विशेष गाडय़ा सोडण्यात येत आहेत. याद्वारे 2021-22 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने 3106 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. ज्यात मालवाहतुकीमधून 2527 कोटींची, प्रवासी वाहतुकीमधून 378 कोटी रुपये आणि अन्य कोचिंग माध्यमातून 104 कोटी आणि अन्य मार्गातून 97 कोटी अशी कमाई केली आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षी याच काळात मिळविलेल्या उत्पन्नापेक्षा 63 टक्के जादा आहे.

पश्चिम रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी कायम राहील याची काळजी घेत 1 एप्रिल ते 3 जुलै 2021 या कालावधीत 207 पार्सल ट्रेन चालविल्या. या काळात मालगाडीवरून 20.95 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात 15.80 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. याच काळात आपल्या विविध पार्सल सेवेद्वारे 76 हजार टन वजनाच्या वस्तूंची वाहतूक केली आहे. ज्यात कृषीजन्य वस्तू, औषधे, आरोग्य चिकित्सा उपकरण, मासे, दूध आदी वस्तूंचा समावेश आहे. ज्यामुळे 25.72 कोटींची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेने 33 हजार टनाहून अधिक दुधाच्या वाहतुकीसोबत 47 मिल्क स्पेशल ट्रेन चालविल्या आहेत. चालविण्यात येणाऱया प्रत्येक वॅगनचा पुरेपूर वापर केला. तसेच 57 कोविड – 19 विशेष पार्सल गाडय़ा सोडण्यात आल्या. तसेच 9000 टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. तसेच याशिवाय 17,300 टन भाराच्या 35 इंडेंटेड रेकचा शत-प्रतिशत उपयोग केला. शेतकऱयांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध झोनमध्ये 16000 टन भारमानाच्या 68 किसान रेल्वे चालविण्यात आल्या. मालवाहतूक करण्यासाठी रेल्वे बोर्डाने बिजनस डेव्हलपमेंट युनिट्स सुरू केली आहेत.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article