Header

‘वर्क फ्रॉम होम’मुळे कामाच्या ताणाचा परिणाम खासगी आयुष्यावर, 59 टक्के पुरुषांनी सर्वेक्षणात दिली माहिती

‘वर्क फ्रॉम होम’मुळे कामाच्या ताणाचा परिणाम खासगी आयुष्यावर, 59 टक्के पुरुषांनी सर्वेक्षणात दिली माहिती

work from home

कोविडमुळे नाईलाजास्तव बंधनकारक झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कामाचा ताण प्रचंड वाढला असून त्याचा खासगी आयुष्यावर परिणाम होत असल्याचे 59 टक्के पुरुषांचे म्हणणे आहे. ‘स्कीकी मार्केट नेटवर्क’ने केलेल्या सर्वेक्षणात त्यांनी ही माहिती दिली.

या सर्वेक्षणादरम्यान देशातील महानगरांमधील सुमारे अडीच हजार नोकरदार स्त्र्ााr-पुरूषांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात कामाच्या ताणामुळे वैयक्तिक आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे 59 टक्के पुरुषांनी आणि 56 टक्के महिलांनी सांगितले. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कामाचा बोझा वाढला आहे. नोकरी टिकेल की नाही याचाही भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे टेन्शन वाढले असून त्याचा परिणाम मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यावर होत आहे असे त्यांनी सांगितले. सध्याच्या कठीण काळात कार्यालयाकडून सहकार्य होत नसल्याचे 20 टक्के पुरुष आणि 16 टक्के महिलांना वाटते.

कुटुंबाची काळजी आणि जबाबदारी असलेले अनेक जण नोकरी गमवावी लागल्याने तणावाखाली असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. 22 टक्के पुरूष आणि 17 टक्के महिलांना कोरोना परिस्थितीमुळे नोकरी गमवावी लागली तर 60 टक्के पुरूष आणि 27 टक्के महिलांना भवितव्याबद्दल चिंता वाटत आहे असे दिसून आले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अधिक महत्व दिले जात असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article