Header

एस्प्लेनेड मेन्शनच्या संवर्धनाबाबत हेरिटेज पॅनेल लवकरच निर्णय घेईल, पालिकेची हायकोर्टात माहिती

एस्प्लेनेड मेन्शनच्या संवर्धनाबाबत हेरिटेज पॅनेल लवकरच निर्णय घेईल, पालिकेची हायकोर्टात माहिती

mumbai-highcourt

फोर्ट येथील ऐतिहासिक एस्प्लेनेड इमारतीची दुरवस्था झाली असून या धोकादायक इमारतीच्या संवर्धनाबाबत हेरिटेज पॅनेल लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात आज दिली.

फोर्ट येथील 150 वर्षं जुनी ऐतिहासिक ‘एस्प्लनेड मेन्शन’ ही इमारत महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. इमारत कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. या इमारतीचा ताबा म्हाडाने जागेच्या मालकाकडे तसेच येथील रहिवाशांना द्यावा व पालिकेने इमारतीच्या रेस्टोरेशनची परवानगी द्यावी, अशी मागणी करत सादिक अली नुराणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. फेब्रुवारी 2020 साली जागेच्या मालकाने इमारतीच्या जतनासाठी व संवर्धनासाठी 50 कोटी देण्याचे न्यायालयात मान्य केले होते. एस्प्लेनेड मेन्शनच्या मालकाच्या वतीने अॅड चिराग बलसारा यांनी कोर्टाला माहिती देताना सांगितले की, मालकाने बांधकामासाठी 20 कोटी बाजूला काढून ठेवले आहेत. तसेच धोकादायक इमारतीचा प्लॅन तयार करण्यासाठी आर्किटेक्टकडे परवानगी मागण्यात आली आहे. म्हाडाच्या वतीने अॅड प्रसाद लाड यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, म्हाडाला कोणताही आक्षेप नाही.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article