Header

मुद्दा – लढाई म्युकरमायकोसिसशी

मुद्दा – लढाई म्युकरमायकोसिसशी

mukar-macrosis

>> डॉ. राहुल तुले

एकविसाव्या शतकात मनुष्यावर आलेल्या सगळ्यात मोठय़ा अशा कोरोनारूपी संकटाने अनेकांच्या जीवनात उलथापालथी घडवल्या आहेत. 2020मध्ये केरळ येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर हिंदुस्थानात सर्वत्र कोरोनारूपी भस्मासुराचा प्रचंड उद्रेक झाला. पण त्यावर वेळीच नियंत्रण मिळवल्याने काहीसा दिलासा मिळाला खरा पण पुन्हा त्याने त्याचे स्वरूप बदलत अक्राळविक्राळ रूप धारण केले. यामुळे सर्वसामान्यांच्या जीकनात अनेक चढउतार आले. त्यामुळे अनेकजणांना आपले जवळचे नातेवाईक गमावावे लागले. तर काही रुग्णांना इंजेक्शन तसेच स्टिरॉइड देऊन त्यांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. मात्र कोरोनामधून बरे झाल्यावर महिन्या दोन महिन्यांनंतर कोरोनाच्या काळात देण्यात आलेल्या स्टिरॉइडस्मुळे काही जणांना त्याचे विविध साइड इफेक्टस् झाले आणि त्यातून जन्माला आला डोळ्यांचा एक आजार. ज्याचे नाव आहे ‘म्युकरमायक्रोसिस’.

साधारणपणे आपल्या सभोवतालच्या वातावरणात अनेक विषाणू आणि बुरशी (फंगस्) आदी सूक्ष्म जिवाणू असतात. त्यापैकीच एक ‘म्युकरमायकोसिस’ हीसुद्धा एक प्रकारची बुरशीच आहे. म्युकरचे प्रामुख्याने काळी, पांढरी, पिकळी बुरशी असे तीन प्रकार सध्या निदर्शनास आले आहेत. कोरोनाच्या काळात अनेक जणांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. तसेच काही जणांच्या रक्तामध्ये असलेली साखरेची पातळी वाढणे व ती नियंत्रणात येण्यासाठी अतिमात्रेची ‘स्टिरॉइडस्’ दीर्घकाळ घेणे, या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे म्युकरमायकोसिस होतो. यासाठी दर तीन ते सहा महिन्यांनंतर आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीची तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. आपल्याला कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास रक्तातील साखरेच्या अतिमात्रेमुळे ती जखम भरून निघण्यास त्यामुळे खूप कालावधी लागतो तसेच त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याचाही धोका वाढतो.

लक्षण काय आणि त्याचे
निदान कसे करायचे?

म्युकरचा संसर्ग शरीराच्या कुठल्या भागाला झाला आहे त्यावरून आजाराची लक्षणं दिसतात. सायनस आणि डोळ्यांच्या भागात संसर्ग झाला तर नाक वाहत राहते व सतत नाक चोंदते, वारंवार डोळ्यांतून पाणी येणे, चेहरा सुजणे, डोळा लाल होणे, ताप येणे, डोके दुखणे, अंधूक दिसणे ही लक्षणे विशेषतः म्युकरची असतात. म्हणून जर वरील कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीराच्या ज्या भागातून या बुरशीचा शिरकाव होतो त्या भागातल्या अवयवांवर त्याचा परिणाम होऊन काही दिवसांनंतर तो अवयव निकामी होण्याची शक्यता असते. या आजाराचे निदान रुग्णाची रक्ततपासणी, एमआरआय आणि सीटी स्कॅन यांच्या रिपोर्टवरून करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, म्युकर हा संसर्गजन्य रोग नाही. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो तर त्याची लागण होण्याचा धोका खूप असतो. म्युकर झालेल्या रुग्णाच्या सानिध्यात आपण आलो तर त्याची कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला होत नाही.

वेळीच उपचार महत्त्वाचे

ग्णांना म्युकरमायकोसिस हा प्राथमिक पातळीकर असल्यास औषध उपचार घेऊन तो बरा होऊ शकतो. दुसऱया पातळीवर तो एकापेक्षा अधिक अवयवांमध्ये पसरला तर औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवदान देता येते. तिसऱया पातळीवर गेलेला म्युकर हे थेट मेंदूवर आघात करतो आणि त्याला केवळ शस्त्रक्रिया करणे एवढाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड आहे. त्यामुळे सर्वांनी वेळीच उपचार घ्यावे.

परिसर स्वच्छ ठेवा

आता पावसाळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांनी तर तीन महिने आपल्या तब्येतीची काळजी घ्यायचीच आहे. इतर सर्वसामान्य लोकांनीसुद्धा कोणत्याही बुरशीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर स्कच्छ ठेवावा. कोणत्याही बुरशीचा उगम हा अस्वच्छ परिसरातूनच होतो. सर्व प्रकारची योग्य ती काळजी घेतल्यास आपण सहजपणे सर्व आजारांवर मात करू शकतो एवढे निश्चित.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article