Header

उत्तराखंडचे मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत, घटनात्मक अडचणीमुळे पद सोडावे लागणार

उत्तराखंडचे मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत, घटनात्मक अडचणीमुळे पद सोडावे लागणार

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे. विद्यमान मुख्यमंत्री तीरथसिंह रावत लवकरच राजीनामा देऊ शकतात. रावत यांना घटनात्मक अडचणीमुळे मुख्यमंत्रीपदावर राहता येणार नाही. या घटनात्मक अडचणीमुळेच रावत यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनीच राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

तीरथसिंह रावत यांना गेल्या बुधवारी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्ली येथे बोलवले होते. त्याच वेळी रावत यांना राजीनामा देऊ लागू शकतो, अशी माहिती त्यांना दिली गेल्याचे सांगितले जाते. रावत यांनी आज राज्यपाल बेबीरानी मौर्य यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. या भेटीमध्ये ते आपला राजीनामा देतील अशी चर्चा होती. मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी भाजपा लवकरच आमदारांची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. रावत यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सतपाल महाराज, धनसिंह यांच्यासह चार ज्येष्ठ आमदारांची नावे चर्चेत आहेत.

…अशी आहे घटनात्मक अडचण

त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर 10 मार्च रोजी पौडी गढवाल येथील भाजपा खासदार तीरथसिंह रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. रावत हे राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत. त्यामुळे घटनेनुसार रावत यांना सहा महिन्यांच्या आत म्हणजेच 10 सप्टेंबरपूर्वी विधानसभा पोटनिवडणूक जिंकावी लागेल. तरच त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहता येणार आहे. तीरथसिंह रावत हे गंगोत्री मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असेही म्हटले जात आहे. कोरोना परिस्थितीमुळे उत्तराखंड पोटनिवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच बहुतेक निवडणुका जाहीर होतील.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article