Header

विद्या बालन, एकता कपूर आणि शोभा कपूर यांना ‘ऑस्कर’चे निमंत्रण; बजावणार मतदानाचा हक्क

विद्या बालन, एकता कपूर आणि शोभा कपूर यांना ‘ऑस्कर’चे निमंत्रण; बजावणार मतदानाचा हक्क

vidya-ekta

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ऑस्कर’ हा पुरस्कार ‘अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अॅण्ड आर्ट सायन्स या संस्थे’तर्फे दिला जातो. या संस्थेने आता बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन, निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांना निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण स्वीकारल्यास हे तिन्ही हिंदुस्थानी सेलिब्रेटी पुढच्या वर्षी होणाऱया ऑस्कर पुरस्कारांसाठी मतदान करू शकणार आहेत.

‘अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर अॅण्ड आर्ट सायन्स’ने यासाठी जगभरातून 395 सेलिब्रेटींची निवड केली आहे. त्यात तीन हिंदुस्थानी सेलिब्रेटींचा समावेश आहे. ‘तुम्हारी सुलू’ आणि ‘कहानी’साठी विद्याची निवड झाली आहे. ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’साठी निर्माती एकता कपूरची तर शोभा कपूर यांची ‘उडता पंजाब’ आणि ‘द डर्टी पिक्चर’साठी निवड झालीय. विशेष म्हणजे मतदानासाठी तयार केलेल्या यादीत 46 टक्के महिलांचा समावेश आहे. ऑस्करमध्ये मतदानासाठी हिंदुस्थानी कलाकारांनी आमंत्रण मिळाल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, इरफान खान, अमिताभ बच्चन, आमीर खान, ऐश्वर्या राय आदींना आमंत्रित केले होते.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article