ईडी म्हटले की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करू, असे सांगतात
ईडी म्हटले की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करू, असे सांगितले जाते. पण, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिले जाईल, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले.
ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर शुगर्स कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसे सत्तेशिवाय भाजप राहू शकत नाही. कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवायची यासाठी कुणावर तरी आरोप करायचे, कुणाला तरी नोटिसा द्या, असे सुरूच असत. त्यामुळे ईडीचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.