Header

बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून कोटयवधीचा गंडा!

बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून कोटयवधीचा गंडा!

fraud

कोरोनाच्या संकटात सर्वच जण पिचलेले असताना पालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी असलेल्या एका महिलेला मात्र झटपट पैसा कमावण्याची हाव सुटली होती. बऱयावाईटाचा विचार न करता तिने पती, दीर यांना सोबत घेऊन एक रॅकेट तयार केले. मुंबई, पुणे पालिकेत नोकरी मिळवून देऊ असे आमिष दाखवून हे रॅकेट बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावू लागले. कोटय़वधी रुपये त्यांनी कमावले, पण अखेर त्यांच्या हातात पोलिसांच्या बेडय़ा पडल्याच.

पालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी प्रांजली भोसले (47) हिने तिचा पती लक्ष्मण भोसले, दीर राजेश भोसले (47), महेंद्र भोसले (51) तसेच पालिकेचा सेवानिवृत्त अधिकारी सोमलिंगप्पा डिलकर (65) यांना हाताशी घेऊन रॅकेट तयार केले होते. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना पालिकेत नोकरीचे आमिष दाखवून लक्ष्मण, राजेश आणि महेंद्र गळाला लावायचे. मग त्या तरुणांची रीतसर मुलाखत घेऊन त्यांना कामाचे अपॉइंटमेंट पत्र द्यायचे व या कामासाठी एकाकडून आठ ते दहा लाख रुपये घ्यायचे. कोरोनाचे संकट असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगारांची फसवणूक करण्याचे त्यांचे कृत्य सुरू होते. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, पण प्रांजली आणि तिचा पती आधीच मुंबई बाहेर पसार झाले होते. प्रॉपर्टी सेलचे प्रभारी निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक गादेकर, मनोज पाटील, साळुंखे तसेच सुनील कांगणे, अशोक सावंत, किरण जगताप, आनंदा गेंगे, महिला कॉन्स्टेबल रंजना निचिते व पथकाने पसार झालेल्या दांपत्याला गोव्यातील काsंडलीम येथून पकडून आणले.

n सोमलिंगप्पा संबंधितांची मुलाखत घेऊन प्रांजली त्यांना अपॉइंटमेंट लेटर द्यायची. त्यानंतर तरुणांकडून लाखो रुपये घेतले जायचे. मग प्रांजली अर्धी रोकड आपल्याला ठेवून उर्वरित इतरांना वाटायची. या टोळीने आतापर्यंत अनेक तरुणांची फसवणूक करून कोटय़वधी रुपये घेतले आहेत, तर पैसे परत मागायला येणाऱया तरुणांना लक्ष्मण दमदाटी करायचा असे पोलिस तपासात समोर आले आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article