Header

Nashik Crime | वाहनावर अशोकस्तंभ लावून लोकसेवक असल्याचे भासवणारा गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

Nashik Crime | वाहनावर अशोकस्तंभ लावून लोकसेवक असल्याचे भासवणारा गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

Nashik Crime Nashik Rural Police's action by pretending to be a public servant by putting Ashoka pillar on the vehicle

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन  – Nashik Crime | चारचाकी गाडीवर पुढे आणि मागे अशोक स्तंभासह (Ashok Stambha) विधानसभेचे स्टीकर (Assembly sticker) लावून आपण लोकसेवक असल्याचे भासवणाऱ्या एकाला वणी पोलिसांनी (Wani police) बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे आमदारांच्या सहीचे कोरे लेटरहेड मिळाले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik Rural SP Sachin Patil) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिंदवड गावाच्या त्रिफुलीवर ही करवाई करण्यात आली असून राहुल दिलीपराव आहेर Rahul Diliprao Aher (वय-32 रा. शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक) Nashik Crime याला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आहेर हा सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा गाडीच्या (एमएच 15 डीएम 4175) पुढील आणि मागील बाजूस असलेल्या काचेवर गोलाकार हिरव्या व सिल्व्हर रंगाचे
सत्यमेव जयते (satyamev jayate) लिहिलेल्या व अशोक स्तंभाच्या चित्राचे स्टिकर लावलेले आढळून आले.
तसेच केवळ अधिवेशन कालावधीसाठी वाहन प्रवेश पास नावाचा लोगो स्टीकर देखील गाडीवर लावल्याचे आढळून आले.

ही गाडी शासकीय असल्याचे भासवण्यासाठी आरोपी राहुल आहेर याने स्टीकर लावल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच विधानसभा सदस्य नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांच्या नावाचे राजमुद्रा असलेली सही असलेले कोरे लेटपॅट देखील त्याच्याकडे आढळून आले.
याशिवाय माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांचे विधानसभा सदस्यांचे ओळखपत्र,
त्यांचा फोटो असलेले व स्वत:चे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रवेश पत्रिका पोलिसांना आढळून आले.

आरोपी राहुल आहेर याने या सर्व कागदपत्रांचा व वाहनाचा गैरवापर करुन विधानभवनात
आमदार शिक्षणमंत्री व इतर मंत्र्यांसोबत आपले जवळचे संबंध असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
लोकांच्या शाळा अनुदानीत करुन देण्याच्या भुलथापा देत त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले.
तसेच त्याच्याकडे खोटे कागदपत्र आढळून आली आहेत.
आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात (Wani police station) भादवी कलम 171, 171अ, 420, 468,469 सह राजमुद्रा प्रति कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत (API Swapnil Rajput) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गुरळे, पाटील, पोलीस हवालदार वराडे, सानप, जगताप खराटे, मासुळे बहिरम यांच्या पथकाने केली.

Web Title : Nashik Crime | Nashik Rural Police’s action by pretending to be a public servant by putting Ashoka pillar on the vehicle

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

The post Nashik Crime | वाहनावर अशोकस्तंभ लावून लोकसेवक असल्याचे भासवणारा गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article